नायगाव-खैरगाव: मरवाळी अंगणवाडी समोर जुन्या भांडणाच्या कारणावरून तिघांनी मिळून एकास काठीने मारहाण करून गंभीर दुखापत केली; पोलीसात गुन्हा
नायगाव तालुक्यातील मौजे मरवाळी अंगणवाडी समोर दि 5 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री साडेआठच्या सुमारास यातील आरोपी 1) प्रशांत मेटकर 2) शिवाजी मेटकर 3) महानंदा मेटकर यांनी संगणमत करून यातील फिर्यादिस जुन्या भांडणाच्या कारणावरून काठीने मारहाण करून गंभीर दुखापत केली व जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी फिर्यादी लुंगारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आज दुपारी नायगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला असुन पुढील तपास सुरू आहे.