अकोला: चोर सोडून संन्यास्याला फाशी. महसूल विभागात कोण करतंय भ्रष्टाचार..
अकोले तालुक्यात महसूल प्रशासनाचा माजूर्डेपणा कमी होताना दिसत नाहीये. जामगाव चिंचवणे हद्दीवरील बाळासाहेब आरोटे यांच्या स्टोन क्रेशरवर रात्रीच्या वेळी काम सुरु असल्याची माहिती महसूल विभागाला देऊनही कोणतीच ठोस कारवाई करण्यात आली नाही. उलट माहिती देणाऱ्यांविरोधचं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. अशा घटना या आधीही घडल्या आहेत. महसूल मंत्र्यांना निवेदन देऊनही परिस्थितीत काहीच सुधारणा झाली नाहीये. भ्रष्ट महसूल अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार असा प्रश्न यावेळी उपस्थित होतोय.