कळमनूरी: कळमनुरी शहरात रेणुका नगर मध्ये चोरी,कपाटातील सोन्याच्या दागिन्यासह 1 लाख 32 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास
कळमनुरी शहरातील रेणुका नगर मधील राहुल साहेबराव राऊत यांच्या घराच्या चॅनेल गेटचे अज्ञात चोरट्याने कुलूप तोडून कपाटातील सोन्याच्या दागिने व रोख रक्कमेसह एक लाख 32 हजार रुपयाचा मुद्देमाल लंपास केला आहे .याप्रकरणी कळमनुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीमधून अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आज दि. 8 नोव्हेंबर रोजी प्राप्त झाली आहे .