“गावात शांती संपली, घरात सुख संपले!” अशा शब्दांत बोरी गावातील महिला मंडळ व नागरिकांनी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्याकडे सोमवारी ता. ५ ला दुपारी २ वाजता निवेदन देत अवैध दारू व्यवसाय तातडीने बंद करण्याची मागणी केली आहे. दारूच्या नशेत महिलांवर व मुलांवर अत्याचार, घरगुती हिंसाचार आणि धमक्यांचे प्रमाण वाढल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाला आहे.