वाशिम नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका 2 डिसेंबर होत असून या अनुषंगाने वाशिम नगरपालिकेतील भारतीय जनता पक्षाचे निवडणूक प्रचार प्रमुख राजू पाटील राजे यांच्या नेतृत्वात नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अनिल केंदळे, प्रभाग 7 चेउमेदवार नितेश राठी आणि सीमा राजगुरू, भाजपचे भीमसेठ जीवनानी, पुरुषोत्तम राजगुरू, कविता खरात, डॉ. जयश्री गुट्टे, गणेश खंडाळकर, राम विजयराव जाधव यांच्या सह भारतीय जनता पक्षाचे विविध पदाधिकारी यांनी या भागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.