धुळे: डबल मनीचे आमिष दाखवून लूटणारी टोळी अजनाळे गावातून गजाआड; धुळे पोलिसांची धडक कारवाई!
Dhule, Dhule | Sep 15, 2025 धुळे तालुका पोलिसांनी इंस्टाग्रामवर पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून लूट करणाऱ्या टोळीला जेरबंद केले. भुसावळच्या सौरभ कोटेचा याला कुसुंबा येथे बोलावून चाकूचा धाक दाखवत ४० हजार रुपयांची रोकड बनावट ‘मनोरंजन बँके’च्या नोटा देऊन लुटण्यात आली होती. तक्रारीनंतर पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांच्या पथकाने अजनाळे गावातून जगराज भोसले व रेवलाल पवारला अटक केली. नागरिकांनी सोशल मीडियावरील फसव्या योजनांपासून सावध राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले.