वर्धा: महात्म ज्योतीबा फुले गृहनिर्माण संस्थेतील फसवणूक:गृहनिर्माण राज्यमंत्री भोयर यांचे चौकशीचे आदेश; पीडितांना न्यायाची आशा
Wardha, Wardha | Oct 13, 2025 महात्मा ज्योतीबा फुले आदिवासी गृह निर्माण संस्थेतील फसवणुकीच्या गंभीर आरोपांची चौकशी करण्याचे आदेश राज्याचे गृह निर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिले आहेत. पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी जिल्हा उपनिबंधकांना हे निर्देश देण्यात आले आहेत. असे आज 13 ऑक्टोबर रोजी रात्री नऊ वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे