आज दिनांक 12 डिसेंबरला पोलीस सूत्रांकडून नुकत्याच प्राप्त झालेल्या माहितीनुसार, मोर्शी पोलीस स्टेशन हद्दीतील अंबाडा येथे क्षुल्लक कारणावरून झालेल्या भांडणात शिवीगाळ करीत लाकडी काठीने मारहाण केल्याची घटना दिनांक नऊ डिसेंबरला रात्री आठ वाजता च्या दरम्यान घडली आहे. याबाबतीत गोविंदा गुलाबराव खंडारकर राहणार अंबाडा यांनी मोर्शी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली असून, दाखल तक्रारीवरून मोर्शी पोलिसांनी गौरव पडोळे नावाच्या युवकावर गुन्हा दाखल करून तपासात घेतला आहे