उमरखेड: जिल्ह्यातील दिव्यांग संस्थांच्या नोंदणीसाठी आवाहन
दिव्यांग हक्क अधिनियम २०१६ च्या कलम ४९ ते ५३ अन्वये दिव्यांगांच्या कल्याण, विकास, पुनर्वसन आणि सक्षमीकरण क्षेत्रात कार्य करणाऱ्या सर्व नागरी समाज संघटना व संस्थांची नोंदणी अनिवार्य आहे. यानुसार अशा संस्थांनी आपला नोंदणी प्रस्ताव जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी, तळमजला, प्रशासकीय इमारत, जिल्हा परिषद, यवतमाळ यांच्या कार्यालयात तात्काळ सादर करावा, असे आवाहन जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी मंगला मून यांनी केले आहे.