पवनी तालुक्यातील कोदुर्ली येथील रहिवासी गणपत राजीराम तेलमासरे (वय ४९ वर्षे) यांनी अज्ञात कारणावरून विषारी औषध प्राशन केल्याने, त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गणपत तेलमासरे यांनी २२ डिसेंबर २०२५ रोजी विषारी औषध घेतले होते, त्यानंतर त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालय पवनी येथे भरती करण्यात आले, मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे रेफर केले.