कुही: नोकरीचे आमीष दाखवून फसवणूक करणाऱ्या आरोपीस शेगाव येथे केली कुही पोलिसांनी अटक
Kuhi, Nagpur | Oct 14, 2025 नोकरी लावून देतो अशी बतावणी करून ,बेरोजगार युवक कडुन रुपये घेऊन फसवणूक करणाऱ्या आरोपीस कुही पोलिसांनी शेगाव येथे अटक अटक केल्याची घटना घडली. पुरुषोत्तम ज्ञानदेव बिलेवार राहणार सैनिक कॉलनी शेगाव असे आरोपीचे नाव आहे. आरोपीने भारतीय लष्कर आणि पोलीस दलात नोकरी लावून देण्याचे आमीष दाखवून बेरोजगार युवकाकडून रुपये घेतले मात्र नोकरी मिळाली नाही. त्यामुळे युवकाने कुही पोलीसात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून आरोपीविरुद्ध कुही पोलिसांनी गुन्हा दाखल केला.