मध्यरात्री रेल्वे टेशन पुलाखाली एका रिक्षा चालकाची दोन जणांकडून धारदार शस्त्राने हत्या
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Oct 2, 2025
आज दि 2 ऑक्टोंबर सकाळी 7 वाजता छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानक उड्डाण पुलाखाली आज सकाळी रिक्षाचालकाची धारदार शस्त्राने हत्या झाल्याची खळबळजनक घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, कारमधून आलेल्या दोघा अज्ञात व्यक्तींनी रिक्षाचालक इमरान शेख याच्यावर कोयत्याने वार करून जागीच ठार मारले व आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. घटनेची माहिती मिळताच वेदांत नगर पोलीस ठाण्याचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून, मृतदेह पुढील तपासासाठी घाटी रुग्णालयात हलविण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केल