महाड नगर पालिका निवडणुकीदरम्यान महाड शहरामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता, या प्रकरणी पोलिस प्रशासनाकडून पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. दोन्ही बाजुच्या तक्रारी आल्यानंतर महाड शहर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आला असून पोलिस तपास सुरु झाला आहे. यामध्ये राष्ट्रवादीच्या सुशांत जाबरे यांच्या ताफ्यातील दोन गाड्यांचे नुकसान झाले असून ताब्यात घेतलेल्या या गाड्यांमधुन लाठ्या, काठ्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत तर जे पिस्टल या राड्यात सापडली आहे.