आरमोरी: आरमोरी विधानसभेचा आमदाराची ब्रम्हपूरी बस डेपोत धडक,क्षेत्रात अनियमित बस सेवेबद्दल विचारला जाब
आरमोरी विधानसभेचा मोठा परीसर हा ब्रम्हपूरी बस डेपो अंतर्गत येत असल्याने येथील बस फेर्याचे नियोजन हे ब्रम्हपूरी बस डेपोतूनच करण्यात येते मात्र मागील काही दिवसापासून क्षेत्रातील ग्रामीण भागातून शिक्षण व नोकरीकरीता प्रवास करणारे नागरीक,विद्यार्थी याना बसफेऱ्यांच्या तुटवड्यामुळे मोठ्या प्रमाणात गैरसोयींचा सामना करावा लागत आहे याबाबद जाब विचारण्याकरीता आज दि.२४ सप्टेबंर बूधवार रोजी दूपारी १२ वाजता आमदार रामदास मसराम यानी ब्रम्हपूरी बस डेपोला भेट दिली.