धरणगाव: अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती
अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अनिल भाईदास पाटील यांची सोमवारी 10 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, महाराष्ट्र प्रदेशच्या प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही महत्त्वपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे.