जालना शहरातील हिंद नगर न्यू मोंढा येथील डि.पी. रोडच्या अत्यंत वाईट अवस्थेबाबत एस.डी.पी.आय पक्षाने तीव्र नाराजी व्यक्त केली. मागील 20 वर्षांपासून या रस्त्याची दुरवस्था कायम असून, महानगरपालिकेने या रस्त्याचे काम तातडीने न केल्यास आंदोलनाचा इशारा गुरुवार दि. 24 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 4 वाजता देण्यात आला आहे. या संदर्भात एस.डी.पी.आय पक्षाचे जिल्हा समिती सदस्य उजेफ खान अफसर खान यांनी जालना महानगरपालिका आयुक्तांना निवेदन सादर केले आहे.हिंद नगर न्यू मोंढा येथील डि.पी.रोड हा मुख्य मार्ग आहे.