जुन्नर: नारायणगाव एसटी स्टँडजवळ 3 गावठी पिस्तूल व 9 जिवंत काडतुसे जप्त; 3 जण अटकेत
Junnar, Pune | Nov 4, 2025 दहशतवाद विरोधी पथक आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त कारवाईत नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीतून तीन जणांना ताब्यात घेऊन 3 गावठी पिस्तूल आणि 9 जिवंत काडतुसे जप्त. गोपनीय माहितीच्या आधारे एसटी स्टँडजवळ छापा टाकण्यात आला. प्रकरणी नारायणगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरू आहे.