छत्रपती संभाजीनगर ः कामावरून काढल्याचा राग आल्याने महिलेसह इतरांनी हॉस्पिटलवरच हल्लाबोल केला. तोडफोड करीत कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना सातारा परिसरात घडली. याप्रकरणी आरोपी महिलेसह इतर आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शर्ली भालेराव, प्रविण विश्वकर्मा, 1 अनोळखी महिला व इतर 15 ते 20 आरोपी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.