हिंगोली: गांधी चौक येथे महिलांना वाटलेल्या साड्या उबाठाच्या कार्यकर्त्यांनी जाळून केला निषेध
हिंगोली शहरात आज दिनांक चार नोव्हेंबर रोजी उबाठा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आमदार संतोष बांगर यांच्याकडून महिलांना वाटलेल्या साड्या जाळून आंदोलन केलं आहे. आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार संतोष बांगर व त्यांचे बंधू श्रीराम बांगर यांनी या साड्या व राशन किट मतदारांना प्रलोभन म्हणून वाटल्याचा आरोप उबाठा शिवसेनेने केला आहे