वैजापूर: वैजापूर नगर परिषद निवडणुकीसाठी पहिला नामनिर्देशन अर्ज दाखल
वैजापूर नगर परिषदेच्या निवडणुकीत पहिला अर्ज दाखल झाला आहे. प्रभाग क्रमांक 7 अ साठी हा अर्ज दाखल करण्यात आला आहे.नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सोमवार तारीख 10 रोजी पासून सुरू झाली असून सोमवारी एकही नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात आलेला नव्हता. तर मंगळवारी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या प्रभाग क्रमांक 7 अ साठी पत्रकार तथा बाजार समितीचे संचालन प्रशांत त्रिभुवन यांचा केवळ एकमेव अर्ज दाखल करण्यात आला आहे.