भोकर तालुक्यातील कोळगाव खु. येथील रहिवासी असणारा शेख निजाम शेख हुसेन याने आपल्या शेतात गहू पेरला होता व त्यांनी काल रोजी दिवसभर गव्हाला पाणी दिले होते व आज दुपारी 2 च्या सुमारास ते शेतात गेले असता त्यांना पाणी दिलेल्या शेतात पायांचे ठसे आढळून आले असून हे ठसे बिबट्याचे असल्याचा अंदाज त्यांनी वर्तवले असून यावेळी रात्रीच्या सुमारास बिबट्या सदृश प्राण्याने एखाद्या जनावराची शिकार केले असून त्यांच्या शेतात जनावरचे हाडं देखील मिळून आली आहेत