भंडारा शहरातील खात रोडवरील 'सुमनोहर सेलिब्रेशन लॉन' येथे घरगुती गॅस सिलिंडरचा बेकायदेशीरपणे व्यावसायिक वापर होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून तहसील कार्यालयाच्या पथकाने २६ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास धाड टाकली. जिल्हा पुरवठा अधिकारी नरेश वंजारी, धान्य खरेदी अधिकारी सुहास टोंग आणि सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी रतनलाल ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षण अधिकारी पोचीराम कापडे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. लॉनच्या किचनमध्ये तपासणी केली असता, स्वयंपाकाच्या सर्व बर्नर