पी.एम.श्री.जि.प.विद्यालय कामरगाव येथील शिक्षकांच्या मार्गदर्शनात वंदे मातरम या गीताला 150 वर्ष पूर्ण झाल्याचे निमित्त साधून ' वंदे मातरम 150 ' अशी अभिनव मानवी साखळी तयार करीत या गीताला दिनांक 9 नोव्हेंबर रोजी सलामी दिली.भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाचे प्रेरणास्रोत असलेल्या वंदे मातरम या गीताला यंदा १५० वर्षे पूर्ण झाली आहेत. या ऐतिहासिक निमित्ताने देशभरात विविध ठिकाणी भव्य उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.