हिंगणा: मोहगाव बुटीबोरी येथे वार्षिक सर्वसाधारण सभा पडली पार
Hingna, Nagpur | Sep 14, 2025 बॅ. शेषराव वानखेडे शेतकरी सहकारी सूतगिरणी मोहगाव (बुटीबोरी) येथे आज वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. सभेत मागील वर्षाचे इतिवृत्ताचे वाचन करून मंजुरी देण्यात आली. सभेला उपाध्यक्ष मधुकरराव वानखेडे, संचालक सर्वश्री देवरावजी रडके, धनराजजी आष्टनकर, प्रतापसिंह चौहान, रवि मेघे, भोजराज घोरमाडे, प्रकाश उमरेडकर, रामराव राठोड, सुनिल निघोट, ज्ञानेश्वर भोस्कर, अरुण येनूरकर, चंद्रकांत तिवारी, अनिल ठाकरे व मोठ्या संख्येने सूतगिरणी चे सभासद उपस्थित होते.