बुलढाणा: शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या सरकारचा जाहीर निषेध - शेतकरी नेते रविकांत तुपकर
परतीच्या पावसाने सोन्यासारखं पीक मातीमोल केलं, हजारो हेक्टर भातशेती उद्ध्वस्त झाली. सरकारकडून भरपाई मिळाली फक्त २ रुपये ३० पैसे ही कसली मदत? हे तर शेतकऱ्यांच्या मेहनतीचा आणि दुःखाचा अपमान आहे.सरकारने शेतकऱ्यांचा अपमान करणे थांबवावे अन्यथा याचे परिणाम खूप गंभीर होतील असे मत क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी ४ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता व्यक्त केले आहे.