उदगीर: उदगीरात बसमध्ये चढताना महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या महिलेला रंगेहाथ पकडले
Udgir, Latur | Sep 17, 2025 उदगीर शहरातील डॉ झाकीर हुसेन चौक येथे बसमध्ये चढताना महिलेच्या गळ्यातील १८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने एक महिला चोरुन घेऊन जाताना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी १६ सप्टेंबर रोजी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात महिला चोराविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे १६ सप्टेंबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास फिर्यादी महिला ही उदगीर शहरातील डॉ झाकीर हुसेन चौकातून कुमठा येथे जाण्यासाठी बस मध्ये चढताना चोरट्या महिलांना दागिने चोरताना रंगेहाथ पकडून पोलिसांनी अटक केली आहे