जिल्हा सामान्य रुग्णालयासाठी शासनाच्या निधीतून अत्याधुनिक एमआरआय मशीन प्राप्त होऊन वर्ष उलटले असतानाही ते अद्याप कार्यान्वित झालेले नाही. या गंभीर निष्क्रियतेविरोधात मराठा महासंघाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बुधवार दि. 12 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता निवेदन सादर करत तात्काळ मशीन कार्यान्वित करण्याबाबत साकडे घातले. उपमुख्यमंत्री शिंदे हे बुधवार दि. 12 नोव्हेंबर रोजी जालना दौर्यावर असताना मराठा महासंघाचे राष्ट्रीय विभागीय चिटणीस अरविंद देशमुख सह इतरांनी निवेदन दिले.