लिंबागणेश ते बोरखेड या रस्त्याच्या कामाला सुरुवात
बीड तालुक्यातील लिंबागणेश ते बोरखेड या रस्त्याच्या कामाला आज बुधवार, १ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता सुरुवात झाली आहे.गेल्या काही दिवसांतील मुसळधार पावसामुळे या रस्त्यावरील पूल खचून वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळे शेतकरी, शालेय विद्यार्थी आणि ग्रामस्थांना प्रवास करताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते.स्थानिक प्रशासनाच्या पुढाकाराने हे काम हाती घेण्यात आले असून, रस्ता दुरुस्त झाल्यानंतर नागरिकांना दिलासा मिळणार आहे.गावकऱ्यांनी या कामाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.