सेलू: गायमुख शिवारात वीज कोसळून 1 बैल ठार; शेतकऱ्याचे 70 हजार रुपयांचे नुकसान
Seloo, Wardha | Sep 15, 2025 शेतात चरत असलेल्या बैलाच्या अंगावर वीज कोसळून झालेल्या दुर्घटनेत एक बैल जागीच ठार झाला. ही घटना ता. 15 सोमवारला दुपारी 2 वाजताच्या सुमारास तालुक्यातील गायमुख शेत शिवारात घडली. यात शेतकरी फकीराजी कडूजी वऱखडे यांचे 70 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.