साकोली: आदर्श नगर कॉलनी सेंदूरवाफा येथे विश्वकर्मा कारपेंटर असोसिएशन तालुका साकोलीच्या वतीने साजरा झाला विश्वकर्मा जयंती उत्सव
सेंदूरवाफा येथील आदर्श नगर कॉलनी येथे विश्वकर्मा कार्पेटर असोसिएशन तालुका साकोलीच्यावतीने बुधवार दि17 सप्टेंबरला सकाळी10 ते सायंकाळी8 या वेळात विश्वकर्मा जयंती विविध कार्यक्रमाचे आयोजन करून साजरी करण्यात आली.यावेळी भगवान विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पूजन,भजन दहीकाला महाप्रसाद, सेवाज्येष्ठ कार्पेटर यांचा सत्कार करण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद चव्हाण, मा. समाजकल्याण सभापती मदनभाऊ रामटेके, मनीष कापगते, रवी परशुरामकर, प्रवीण भांडारकर, डाकराम कापगते उपस्थित होते Sakoli, Bhanda