जळगाव: 'तुतारी व मशाल'कडून जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; माजी आ.संतोष चौधरी यांची हॉटेल के.पी. प्राईड येथे घोषणा
जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत महाविकास आघाडीने आपला पत्ता उघड केला असून जागावाटपाचा महत्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. या निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष ३८ जागांवर, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष ३७ जागांवर निवडणूक लढविणार आहे. माजी आमदार संतोष चौधरी यांनी रविवारी २८ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजित पत्रकार परिषदेत या युतीची अधिकृत घोषणा केली.