श्रीवर्धन: गुटखा बंदीला छेद; श्रीवर्धनात बेकायदेशीर विक्री सुरू
श्रीवर्धन तालुक्यात गुटखा बंदीची अंमलबजावणी पुन्हा एकदा प्रश्नचिन्हात येत आहे. ऑगस्ट महिन्यात 98,000 रुपयांचा गुटखा जप्त करून श्रीवर्धन पोलिसांनी गुटखा माफियांना मोठा धक्का दिला होता. त्या कारवाईनंतर तब्बल तीन महिने माफियांनी पुरवठा थांबवला. मात्र, गेल्या आठवडाभरात गुटख्याचे वितरण पुन्हा सुरू झाल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. महाराष्ट्र शासनाने तंबाखू, निकोटीन आणि मॅग्नेशियम कार्बोनेट असलेल्या गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखू उत्पादनांवर पूर्ण बंदी घातली आहे.