खंडाळा: पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पारगाव कमानीसमोर ट्रकचा अपघात
पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पारगाव कमानीसमोर ट्रकचा अपघात पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील पारगाव येथील कमानीजवळ ट्रकचा अपघात रविवारी दुपारी पावणे एक वाजण्याच्या सुमारास झाला. अपघातग्रस्त ट्रक इतर चार चाकी वाहनांवर कलला गेल्याने त्या वाहनांचे नुकसान झाले, अशी माहिती स्थानिक बघ्यांनी दिली. अपघाताचे कारण समजू शकले नाही. या अपघातात कोणीही जखमी झाले नसून याची नोंद खंडाळा पोलीस ठाण्यात झाली नव्हती.