पेण: पक्ष संघटना किती मजबुत आहे हे बघुन सिट मागितल्या पाहिजेत-आ.महेंद्र दळवी यांचा राष्ट्रवादी विरोधात हल्लाबोल..
Pen, Raigad | Oct 26, 2025 शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांनी रायगडच्या पेणमध्ये पत्रकार परिषद घेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी विरोधात हल्ला बोल केला आहे. आमच्यामुळे ते खासदार म्हणून निवडून गेलेत याची आठवण करून देत मतदार संघात कोणाची ताकद किती त्या प्रमाणात सिटच वाटप करण्याचा प्रस्ताव दळवी यांनी मांडला आहे.