बुलढाणा: रब्बी हंगाम 2025 पिक स्पर्धा, अर्ज भरण्यासाठी 31 डिसेंबरची अंतिम तारीख
बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची उत्पादकता वाढविणे आणि प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनामार्फत अन्नधान्य, कडधान्य आणि गळीतधान्य पिकांसाठी रब्बी हंगाम 2025 पिक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख : 31 डिसेंबर 2025 आहे.ज्वारी, गहू, हरभरा, करडई, जवस या पाच पिकांसाठी बुलढाणा जिल्ह्यात स्पर्धा आयोजित आहे.शेतकरी बांधवांनी आपल्या तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केले आहे.