अहेरी: राजाराम ग्रामपंचायतमध्ये पसरले घाणीचे साम्राज्य. ई -कचरागाडी गेली कोमात.
अहेरी :पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या राजाराम गावात असलेल्या विविध अस्वच्छता,सांडपाणी आणि कचऱ्याने तुंबलेल्या नाल्याची सफाई नसल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरलेली आहे.घराच्या परिसरात तसेच वस्त्यातील नाल्याची दुर्गंधी आणि डासांचा प्रादुर्भावाने नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे.