धुळे उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात थंडीची लाट कायम आहे आणि हवामान विभागाने पुढील आठवड्यातही गारठा कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. २० डिसेंबर शनिवारी सकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान 5.3°c तापमान असल्याने राणा प्रताप चौकात रस्त्याजवळ शाळेत जाण्यापूर्वी थंडीपासून बचावासाठी शेकोटी पेटून थंडीपासून बचाव करताना काही विद्यार्थी दिसून आले. सकाळी मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेले नागरिक वाढत्या थंडीपासून वाचण्यासाठी स्वेटर, कानटोपीसह इतर गरम कपडे घालताना दिसून येते आहे बाजार