ज्या घरची कुटुंबप्रमुख महिला असते, त्या कुटुंबाचा विकास होतो. आज कुटुंबप्रमुख म्हणून जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी या दोघीही महिला लाभल्या आहेत. समस्यांविरुद्ध त्या लढत असून, तुम्हा सर्वांना त्यांच्या तलवारीची धार बनावी लागेल. त्याशिवास समस्या सुटना नाहीत असे प्रतिपादन छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेचे आयुक्त व प्रशासकीय अधिकारी जी. श्रीकांत यांनी केले. बुधवार दि. 17 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 ते 2 वाजेदरम्यान आयोजित शहर विकास मंथन कार्यक्रमात ते बोलत होते.