शिरूर: चिंचणी गावात घरफोडीची घटना..! दीड तोळे सोनं व पाच भार चांदी चोरीला; शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Shirur, Pune | Sep 23, 2025 चिंचणी (ता.शिरूर)येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून दीड तोळ्याचे सोन्याचे गंठण आणि पाच भार चांदीचे पैंजण असा ऐवज (ता.22) मध्यरात्री चोरून नेल्याची घटना घडली आहे.या प्रकरणी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.