महाड: आम्ही कोणाच्या पाठीमागे लागणार नाही.. मंत्री भरत गोगावले यांनी दिले युतीचे संकेत..@raigadnews24
Mahad, Raigad | Oct 23, 2025 आगामी काळात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये रायगड जिल्ह्यात रस्सीखेच सुरू असून महायुतीतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. समान जागा वाटपाचा महायुतीतील फॉर्मुला ठरला असताना जर का कोणी दोन पावले मागे येत नसेल तर एकला चलो च्या भूमिकेत आम्ही राहू असा इशारा मंत्री भरत गोगावले यांनी महायुतीतीलच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांना नाव न घेता दिला आहे.