राहाता: शिर्डीतील चार दुकानांचे आगीमुळे कोळशाच्या ढिगात रुपांतर....!
शिर्डीत दिवाळीच्या रात्री लागलेल्या आगीत साडीच्या शोरुम सह चार दुकाने जळून खाक झालीये.. नवीन दर्शन रांगे समोर ही घटना घडली असून यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेय.. दिवाळीच्या सणा नंतर शिर्डीत होणारी गर्दी लक्षात घेवून व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात दुकानात माल भरलेला होता.. मध्यरात्री अचानक आग लागली असून बघता बघता आगीनं रौद्ररुप धारण केलय.. जवळपास सहा तास आग्नीशमन विभागानं प्रयत्न करुन आग आटोक्यात आणलीये.. सध्या याठिकाणी कोळशाच खच पडल्याचं दिसून येत आहे.