सेलू: मोहगाव-शिवनगाव शिवारात मोठ्या प्रमाणात गावठी दारू भट्टीचा पर्दाफाश; ₹404000 चा मुद्देमाल नष्ट, आरोपी पसार
Seloo, Wardha | Oct 11, 2025 तालुक्यातील मोहगाव- शिवनगाव शिवारात सुरू असलेल्या अवैध गावठी दारू भट्टीचा पर्दाफाश पोलिसांनी केला आहे. या कारवाईत दारू तयार करण्यासाठी वापरलेले मोहा सडवा, इतर साहित्य आणि तयार दारू असा एकूण ₹4,04,000/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई ता. 11 शनिवारला दुपारी 4.15 वाजताचे सुमारास सेलू पोलिसांनी केली. घटनास्थळावरून दोन आरोपी फरार झाले असून पोलिसांनी त्यांच्यावर सायंकाळी 7 वाजता गुन्हा नोंद करण्यात आला. अशी माहिती सेलू पोलिसांकडून मिळाली.