नेवासा: शेतकरी झाले आक्रमक ; 'रस्तारोको' चा दिला इशारा
नेवासा तालुक्यात अतिवृष्टीची जाहीर केलेली मदत दोन दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग न झाल्यास संभाजीनगर - अहिल्यानगर महामार्ग -माळीचिंचोरा फाट्यावर रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा तामसवाडीचे माजी सरपंच चंद्रकांत जगताप यांनी दिला आहे. मदत मिळाली असून उर्वरित शेतकरी प्रतीक्षेत आहेत.