बुलढाणा: मढ येथील तरुणाच्या हातात फटाका फुटल्याने जखमी,हातात फटाके फोडू नये,डॉ.गणेश गायकवाड यांचे आवाहन
बुलढाणा तालुक्यातील मढ येथील एका तरुणाच्या हातात फटाका फुटल्याने त्याच्या हाताला इजा झाली आहे.त्याचा बुलढाणा येथील डॉ. गणेश गायकवाड यांच्याकडे उपचार सुरू आहे.दिवाळीचा आनंद घेतांना,फटाके फोडतांना खबरदारी घेतली पाहिजे,हातात फटाके फोडायचे नाही,जेणे करून आनंदाच्या या पर्वात विरजण पडू नये,असे आवाहन बुलढाणा येथील सर्जन डॉ.गणेश गायकवाड यांनी केले आहे.