कळमेश्वर: कळमेश्वर नगरपरिषद येथील वाचनालयाचे करण्यात आले उद्घाटन
कळमेश्वर शहरातील नगरपरिषद येथील वाचनालयाचे आज सोमवार दिनांक 3 नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता च्या सुमारास भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉक्टर राजीव पोतदार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करता यावा याकरिता हे वाचनालय उघडण्यात आलेले आहे.