महाबळेश्वर: आंबेघर बौद्ध वस्तीमधील अतिक्रमण हठवून आम्हाला हक्काचं रस्ता द्या रिपब्लिकन पक्षाची, जावळी तहसीलदारांकडे मागणी
आंबेघर तर्फे कुडाळ ता. जावली मधील आज अखेर शासनाच्या वतीने झालेल्या जनगणनेनुसार बौद्ध वस्तीची चुकीची आकडेवारी लागल्यामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले असतानाही आंबेघर बौद्ध वस्ती मात्र पारतंत्र्यात आहे, आज अखेर लोकसंख्येच्या आडमुठी नोंदीमुळे बौद्धवस्तीच्या विकासाला खिळ बसली आहे, बौद्ध वस्ती कडे जाणाऱ्या रस्त्याची ग्रामपंचायत दप्तरी नोंद असल्यामुळे काही वर्षांपूर्वी, दहा फुटी रस्त्यावर खडीकरण झाल्याचे दिसून आल्याचे सांगितले.