सांगोला: दोन लाख रुपये, सोनं आणा नाहीतर छळ; साठेनगरातील विवाहितेची फिर्याद; सांगोल्यात गुन्हा दाखल
माहेरून सोनं व घर बांधकामांसाठी दोन लाख रुपये घेऊन ये म्हणून विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी नवरा, सासू, सासरे, नणंदेविरुद्ध गुन्हा दाखल झाला.आहे. ही घटना साठेनगर सांगोला येथे घडली. याबाबत सुषमा विशाल सूर्यगंध हिने फिर्याद दिली आहे. पती विशाल सूर्यगंध, सासू मंगल सूर्यगंध, सासरे भीकू सूर्यगंध (सर्वजण रा. साठेनगर), प्रियंका गडहिरे (रा. वाणीचिंचाळे, ता. सांगोला), विद्या भोरे (रा. हिवताड ता. आटपाडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.