पाथर्डी: शिरापूर गावातील वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला. परिसरातून हळहळ व्यक्त..
शिरापूर गावातील ३१ वर्षीय अतुल रावसाहेब शेलार हा तरूण शनिवारी सायंकाळी ७ च्या सुमारास घरी जात असताना अचानक आलेल्या पुराच्या पाण्यात वाढून गेला होता. काही तरुणांच्या डोळ्यादेखत घटना घडली असून ग्रामस्थांसह तालुका प्रशासन त्या क्षणापासून त्याचा शोध होत होते, दोन दिवसांपासून ग्रामस्थ, स्थानिक प्रशासन NDRF ची टीम अतुलचा शोध घेत होते. अखेर मंगळवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास तीसगाव येथील भडकेवस्ती शेजारी बंधाऱ्याच्या कडेला त्याचा मृतदेह आढळून आला. सदर मृतदेह सापडताच परिसरातून हळहळ व्यक्त.