नगरपालिका निवडणुकीच्या आठ दिवस अगोदर राजेश परदेशी यांनी शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर पक्षप्रवेशाच्या दुसऱ्याच दिवशी राजेश परदेशी यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. आणि पुन्हा काल 22 डिसेंबर रोजी रात्री त्यांच्या घरासमोर पार केलेल्या गाडीची तोडफोड करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. हल्ला करणाऱ्या विरुद्ध पोलीस तक्रार दिली आहे मात्र पोलिसांनी योग्य ती कारवाई केली नाही असा आरोप परदेसी यांच्या पत्नीने केला आहे.घडलेल्या घटनेमुळे बदलापूरमध्ये पुन्हा राजकीय वातावरण तापले