मेहकर: दे.माळी येथील अंजली मगर ठरल्या बेस्ट मेकअप आर्टिस्ट
मोठ्या स्वप्नांसाठी प्रयत्न करणाऱ्या तरुणाईंसाठी प्रेरणादायी.
बुलढाणा येथे नुकत्याच संपन्न झालेल्या प्रोफेशनल ब्युटी एक्सपो मध्ये देऊळगाव माळी तालुका मेहकर येथील अंजली सतीश मगर (इरतकर) यांनी आपले कौशल्य सिद्ध करून ‘बेस्ट मेकअप आर्टिस्ट’ या पुरस्कारावर नाव कोरले आहे. नुकत्याच बुलढाणा शहरांमध्ये दोन दिवसाचा एक्सपोमध्ये जिल्ह्यातील तसेच इतर भागातील अनेक ब्युटी आर्टिस्ट तज्ञ मान्यवर उपस्थित होते.